
शरद पवार वाढदिवस
67959
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस जिल्हा परिषद कर्मचारी सोयायटी हॉलमध्ये झाला. या वेळी आमदार हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, राजू लाटकर, आदिल फरास, अनिल साळोखे, नधुकर जांभळे, जयकुमार शिंदे आदी.
शरद पवार यांनी विकासात
सर्व घटकांना सामावून घेतले
आमदार मुश्रीफ; पवार यांच्या वाढदिनी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे केवळ राजकारणच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील कार्य देदीप्यमान आहे. त्यामुळे शरद पवार हे एक लोकविद्यापीठ असून, त्यांनी तरुणांपासून समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले, असे मत माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी मुंबईतील मुख्य कार्यक्रमातून शरद पवार यांच्यासह, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, राजू लाटकर, जहिदा मुजावर, आदिल फरास आदी उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘देशभरात शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. कृतीशील वारसा जपताना त्यांनी विविध क्षेत्रांत केलेले काम तरुणाईसह सर्वांसाठीच आदर्शवत आहे. दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम करताना शेतीतील प्रगतीचा आलेख त्यांनी कायम उंचावत ठेवला. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवले. राज्यातील साखर कारखानदारीला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. जीएम मोहरी ही जात विकसित केली तर देशातील खाद्यतेलाचा प्रश्न कायमचा निकालात निघेल, असे नुकतेच पवार यांनी सांगितले आहे. राज्यातील दरडोई उत्पन्न वाढवण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाचाच खरा वाटा आहे.’’
------------------
चौकट
सीमावादासाठी प्रसंगी कारकीर्द पणाला
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर शरद पवार यांनी सुरवातीपासून लढा दिला असून, मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी ते आजही आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी आपली राजकीय कारकीर्दही प्रसंगी पणाला लावली. अलीकडच्या काळात मात्र काही लोकांकडून महापुरुषांचा अपमान होत असून, हे दुर्दैवी असल्याचेही आमदार मुश्रीफ म्हणाले.