
दौलतची बिले जमा
chd122.jpg-
68075
मानसिंग खोराटे
-----------------
‘दौलत अथर्व’ची
30 नोव्हेंबरअखेरची बिले जमा
चंदगड, ता. 12 ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत- अथर्व कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील दुसऱ्या पंधरवड्यातील 16 ते 30 नोव्हेंबरअखेरची ऊस बिले संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी ही माहिती दिली. या हंगामात सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगला प्रतिसाद आहे. तीन हंगामांत शेतकऱ्यांना वेळेत बिले वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांतूनही आपल्या मालकीचा ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवण्यात येत आहे. यंदा कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्त दर निश्चित केला आहे. प्रतिटन 3001 रु.प्रमाणे बिले आदा केली आहेत. गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संचालक पृथ्वीराज खोराटे, विजय पाटील, टेक्निकल युनिट हेड ए. आर. पाटील, सेक्रेटरी विजय मराठे यांनी केले.