निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

68091
चंद्रकांत चौगले
कोल्हापूर : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील चंद्रकांत दत्तू चौगले (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार कृष्णात चौगले यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

68093
चंद्रकांत रांगोळे
कोल्हापूर : रंगकमलनगर, देवकर पाणंदमधील चंद्रकांत दादा रांगोळे (वय 76) यांचे निधन झाले. ते लक्ष्मीपुरीतील मिरची व्यापारी होते. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

68102
ललिता जोशी
कोल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील श्रीमती ललिता माधव जोशी (वय 82) यांचे निधन झाले. मुरगूड परिसरात त्यांनी अनेक वर्षे प्राथमिक शिक्षिका म्हणून अध्यापन केले. प्रायव्हेट हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रसन्न जोशी, चित्रकार सुनील जोशी यांच्या त्या मातोश्री होत.

68104
आनंदी आडुरकर
कोल्हापूर : उभा मारुती चौक, शिवाजी पेठ येथील आनंदी भागवत आडुरकर (सुतार) (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, पाच मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

68131
शशिकांत पाटील
नेसरी ः येथील शशिकांत कृष्णाजी पाटील (वय 50) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. बुधवारी (ता. 14) नेसरीत रक्षाविर्सजन आहे. गडहिंग्लजचे पत्रकार जगदीश पाटील यांचे ते बंधू होत.
-----------------------------------------------

68132
मारूती जाधव
गडहिंग्लज ः हसूरसासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्त शिक्षक मारुती मऱ्याप्पा जाधव (99) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (ता.14) रक्षाविसर्जन आहे. निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी जयराम जाधव यांचे ते वडील होत.

04483
सौ. इंदुमती नाळे
कागल : येथील सौ. इंदुमती शंकरराव नाळे (सणगर) (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

२८०६
रंगराव गावडे
माजगाव ः आळवे (ता पन्हाळा) येथील रंगराव बाजीराव गावडे (वय ७०)यांचे निधन झाले. प्राथमिक शिक्षक संजय गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

00757
बाबूराव पडवळ
साळवण : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील बाबूराव धोंडीराम पडवळ (वय ९०) यांचे निधन झाले. येथील विठ्ठल-रखुमाई दूध संस्थेचे संचालक बाजीराव पडवळ व शिक्षक बळीराम पडवळ यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १३) आहे.

00345
हिराबाई चिले
देवाळे ः पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील हिराबाई लक्ष्मण चिले (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

02044
हौसाबाई माने
हुपरी : सुळकुड (ता. कागल) येथील हौसाबाई बाळू माने (वय १०१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र शिंदे यांच्या त्या आत्या होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

00868
भामाबाई पाटील
सातवे ः आमतेवाडी (ता.पन्हाळा) येथील भामाबाई दत्तत्रेय पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१३) आहे.

07737
शांताबाई हुजरे
घुणकी : नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथील श्रीमती शांताबाई भगवान हुजरे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १३) आहे.