मुश्रीफ प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ प्रेस
मुश्रीफ प्रेस

मुश्रीफ प्रेस

sakal_logo
By

राज्यपालांचे पत्र म्हणजे
शिवरायांचा अपमानच ः मुश्रीफ

कोल्हापूर, ता. १२ ः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेले पत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानच आहे. त्यांना पदावरून बाजूला करणे आवश्‍यक असताना सहानुभूती दाखवली जात आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुश्रीफ म्हणाले, ‘माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला दहा दिवसांची स्थगिती दिली. या विरोधात सर्वच्च न्यायालयात दाद मागू. राज्यपालांबाबत केंद्र सरकारने भूमिका घ्यावी यासाठी छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे यांचे प्रयत्न सुरू आहेत. काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे.’
आपल्या गटाचा सरपंच निवडून दिला तरच निधी देऊ, असे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, ‘अशा वक्तव्यांनी जनता पेटून उठेल आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभवच करेल. त्यांनी निधी दिला नाही तर ठाकरे गटाचे आमदार, खासदार त्या गावांना निधी देतील.’
राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या जन्माच्या अगोदरपासूनच सीमाप्रश्‍न सुरू आहे. मग तेच हा प्रश्‍न कसा पेटवतील? दोन वर्षांत हा प्रश्‍न सुटणारा नाही. मागील पाच वर्षांत राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी का हा प्रश्‍न सोडवला नाही, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

‘शाई फेक दुर्दैवी’
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाई फेक दुर्दैवी आहे. असा प्रकार व्हायला नको होता; पण पाटील सातत्याने अशी विधाने करत आहेत. पाटील यांची माफी मागण्याची ही सातवी ते आठवी वेळ आहे, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.