आवश्‍यक काही बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्‍यक काही बातम्या
आवश्‍यक काही बातम्या

आवश्‍यक काही बातम्या

sakal_logo
By

शाहू ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बुधवारी सभा
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे मासिक सभा बुधवारी (ता. १४) सायंकाळी चार ते सहा वेळेत बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे आयोजित केली आहे. आरती मानसिंग जगताप हिचे स्मरणार्थ शहरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदाकरिता करोओके गायन स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम १५ स्पर्धकांना भाग घेता येईल. परीक्षकांच्या समक्ष स्पर्धा घेण्यात येईल. त्यांचा निर्णय अंतिम असेल. प्रथम येणाऱ्या बक्षीस ७००, द्वितीय ५००, तृतीय ३०० रुपये, उत्तेजनार्थ २००, १०० रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. नाव नोंदणीसाठी कोषाध्यक्ष नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष डी. एस. घोलराखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
----------------
वधू-वर पालक परिचय मेळावा
कोल्हापूर : अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघातर्फे चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी (ता. २५) सकाळी ११ ते सायंकाळी चार वेळेत जय पॅलेस मंगल कार्यालय, कोल्हापूर-गारगोटी रोड, झाडाच्या गणपतीजवळ, कळंबा येथे होणार आहे. मेळाव्यास महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातून वधू-वर येणार आहेत. वधू-वरांनी आपला फोटो, बायोडेटा घेऊन वेळेत यावे. वधू-वरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे राज्य अध्यक्ष रघुनाथराव मोरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल नांगरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
-----------------
68140
कोल्हापूर : राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर.

अनिल कवडे यांची
चौगुले पतसंस्थेस भेट
कोल्हापूर : राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार विभागाचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरी बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्याकरिता आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी स्वागत करून संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. कवडे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीकरिता मार्गदर्शन केले. विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षक) डी. टी. छत्रीकर, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, सहायक निबंधक प्रदीप मालगावे, संस्थेचे सह सरव्यवस्थापक तुकाराम द. पाटील, शशिकांत मोरे, वसंतराव चव्हाण, सहकार खात्याचे अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.