महाविका आघाडी निवेदन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविका आघाडी निवेदन बातमी
महाविका आघाडी निवेदन बातमी

महाविका आघाडी निवेदन बातमी

sakal_logo
By

६८११७

मंत्री चंद्रकांत पाटील
यांच्यावर गुन्हा दाखल करा

महाविकास आघाडीची मागणी

कोल्हापूर, ता. १२ ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे महापुरषांचा अपमान झाला आहे. समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. या मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, मंत्री पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अनुद्‌गार काढले. त्यामुळे महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झाला. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर जाती वाचक बोलणे, जाती-जातीत तेढ निर्माण करणे, राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे, कायदा सुव्यवस्था बिघडवणे याबाबतचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी. गुन्हा दाखल न केल्यास आपल्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्‍यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तौफिक मुलाणी, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम, राजू साबळे, संपतराव पाटील उपस्थित होते.

चौकट
मंत्री, आमदारांची दांडी
महाविकास आघाडीतील पक्षांनी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावर आंदोलन केले. या वेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन देण्याचे निश्चित केले. मात्र, आज निवेदन देताना महाविकास आघाडीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील अनुपस्थित होते. महाविकास आघाडीचे आमदारही निवेदन देण्यासाठी आले नाहीत.
---------------------------