महाविका आघाडी निवेदन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविका आघाडी निवेदन बातमी
महाविका आघाडी निवेदन बातमी

महाविका आघाडी निवेदन बातमी

sakal_logo
By

68117

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा
दाखल करण्याची ‘महाविकास’ची मागणी

कोल्हापूर ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे महापुरषांचा अपमान झाला आहे. समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. या मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना दिले. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्‍यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तौफिक मुलाणी, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम, राजू साबळे, संपतराव पाटील उपस्थित होते. दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांनी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावर आंदोलन केले. या वेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन देण्याचे निश्चित केले. मात्र, आज निवेदन देताना महाविकास आघाडीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील अनुपस्थित होते. महाविकास आघाडीचे आमदारही निवेदन देण्यासाठी आले नाहीत.