शहर स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर स्वच्छता अभियान
शहर स्वच्छता अभियान

शहर स्वच्छता अभियान

sakal_logo
By

शहर स्वच्छता अभियानांतर्गत
स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, ता. १२ ः शहरातील गटर व रस्ते सफाई तसेच कचरा संकलनाच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोल्हापूर शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. १५ डिसेंबरपासून १६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या अभियानात १२ पातळीवर ८१ प्रभागांत स्पर्धा होतील. त्यासाठी महापालिका पातळी, विभागीय कार्यालयाच्या पातळीवर सनियंत्रण समिती व प्रभागनिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
उपायुक्त आडसूळ म्हणाले, ‘‘महापालिकेचा १५ डिसेंबरला वर्धापनदिन आहे. त्याचे औचित्य साधून अभियान होईल. चार विभागीय कार्यालय स्तरावरील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रत्येकी तीन अशा १२ पैकी प्रथम पाच प्रभागांना बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.त्यासाठी कचरा संकलन, मुख्य रस्ते स्वच्छता, ड्रेनेज, नाले व गटारी स्वच्छता, सार्वजनिक शौचालय व मुतारी स्वच्छता, सुशोभीकरण, प्लास्टिकबंदी अंमलबजावणी, आयईसी, आरोग्यविषयक उपाययोजना, कंटेनरमुक्त शहर, नावीन्यपूर्ण उपक्रम, मनुष्यबळ व साहित्य व्यवस्थापन, तक्रार निवारण आदी विषयांसाठी शंभर गुण दिले जातील. १ ते १० फेब्रवारीदरम्यान पाहणी करून अंतिम गुणांकन करण्यात येणार आहे. चारही विभागीय कार्यालय स्तरावर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या तीन प्रभागांना तसेच महापालिका स्तरावरील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या तीन प्रभागांना सन्मानित करण्यात येईल.