तांत्रिक मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांत्रिक मंजुरी
तांत्रिक मंजुरी

तांत्रिक मंजुरी

sakal_logo
By

‘नगरोत्थान’च्या ११५ कोटींच्या
प्रस्तावास तांत्रिक मंजुरी
कोल्हापूर, ता. १२ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत रस्ते, गटार, भुयारी मार्ग व फुटपाथच्या कामांसाठी सादर केलेल्या ११५ कोटींच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तो नगरविकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.
पत्रकात म्हटले आहे, ‘२०१९ आणि २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे पंचगंगा व त्यास जोडणाऱ्या नाल्यांमुळे महापुराचा फटका बसला. ३५ प्रभाग महापुराच्या पाण्याने बाधित झाले होते. या प्रभागातील रस्त्यांची चाळण झाली असून, नागरिकांना त्रास होत आहे. या निधीद्वारे शहरातील प्रमुख वर्दळीचे १९ रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटर, ड्रेनेज लाईन व फुटपाथ यांचा विकास करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून दोन प्रस्ताव सादर केले होते. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन २३७ कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील कामांचा प्रस्ताव सध्याच्या डीएसआरनुसार सादर करण्याच्या सूचना दिल्या. प्रमुख १९ कामांसाठी ११५ कोटींच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यताही दिली. महानगरपालिकेने उपसमितीचा ठराव करून तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांनी या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी दिली.