Fri, Jan 27, 2023

विद्यापीठात आरोग्य शिबीर संपन्न
विद्यापीठात आरोग्य शिबीर संपन्न
Published on : 12 December 2022, 6:54 am
विद्यापीठात आरोग्य शिबिर
कोल्हापूर ः विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सीपीआरतर्फे एड्स विषयकजाणीव जागृती याविषयावर व्याख्यान व आरोग्य शिबिर झाले.डॉ. दीपक सावंत यांनी एच. आय. व्ही एड्सबाबत व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायबाबत माहिती दिली. युवा पिढीला यौन समस्यासंदर्भात येणाऱ्या तसेच असुरक्षित यौन संबधामुळे कशाप्रकारे उर्वरित आयुष्यात एड्स सारख्या भयंकर समस्येला सामोरे जावे लागेल याचे मार्गदर्शन केले.सीपीआरच्या योगी डांगे, सारंग परीट, वेदांत कोळपकर यांनी मधुमेह तपासणी व डोळे तपासणी केली. आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुमन बुबा, उदय घाटे, असावरी कागवाडे उपस्थित होत्या. अरविंद पालके यांनी प्रास्तावित केले.