जिल्हा परिषदेबरोबर संयुक्त बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेबरोबर संयुक्त बैठक
जिल्हा परिषदेबरोबर संयुक्त बैठक

जिल्हा परिषदेबरोबर संयुक्त बैठक

sakal_logo
By

कचऱ्याप्रश्‍नी संयुक्त बैठक घेणार
कोल्हापूर, ता. १२ ः ग्रामीण भागातून शहरात येणारे सांडपाणी तसेच प्रवेशमार्गावर टाकला जाणाऱ्या कचऱ्याप्रश्‍नी मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन व जिल्हा परिषदेची संयुक्त बैठक होणार आहे. दरम्यान, कचरा प्रश्‍नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढलेल्या नोटीसला महापालिकेने उत्तर दिले आहे.
महापालिकेच्या हद्दीत ग्रामपंचायतीतून विनाप्रक्रिया सांडपाणी येते. त्याची पाहणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामपंचायतींना नोटीस काढल्या होत्या. तसेच शहराच्या प्रवेशमार्गावर कचरा टाकला जात असल्याबद्दलही पाच ग्रामपंचायतींना मंडळाने नोटीस काढल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा परिषदेसोबत संयुक्त बैठक घेऊन काय मार्ग काढता येतो यावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले. कचरा टाकणे थांबवणे वा सांडपाणी रोखण्यासाठी ग्रामपंचायतींवर दंडात्मक कारवाई करता येईल का याचा विचार केला जाणार आहे.