Mon, Jan 30, 2023

हॉकी स्टेडियम
हॉकी स्टेडियम
Published on : 12 December 2022, 5:47 am
महापालिकेच्या वायरमनला मारहाण
कोल्हापूर ः स्ट्रिट लाईटवरील केबल्स काढण्यावरून आज हॉकी स्टेडियमजवळ काहीजणांनी महापालिकेच्या वायरमनला मारहाण केल्याचे समजते. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. याबाबत अदखलपात्र म्हणून नोंद झाल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले. महापालिकेतर्फे स्ट्रिट लाईटवरील केबल्स काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एक वायरमन केबल काढताना झालेल्या गैरसमजातून तिथे जमलेल्या काहींनी वाद घालत त्याला मारहाण केल्याचे समजते. यामुळे तेथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. वायरमनला धक्काबुक्की झाल्याचे समजताच महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनीही या घटनेची नोंद केली आहे.