शिक्षक पुरस्कार बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक पुरस्कार बातमी
शिक्षक पुरस्कार बातमी

शिक्षक पुरस्कार बातमी

sakal_logo
By

६८१४७

गुणवत्तावाढीसाठी
शिक्षकांनी प्रयत्न करावेत

माजी मंत्री सतेज पाटील यांचे प्रतिपादन.

कोल्हापूर, ता. १२ ः स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमधील गुणांचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले. राम गणेश गडकरी सभागृहात खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे आयोजित शिक्षण परिषद आणि शिक्षण जागर पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भरत रसाळे होते.
सतेज पाटील म्हणाले, ‘नव्या शैक्षणिक धोरणात इतिहास पुसला जाणार असेल, तर त्याविरोधात लढा देण्याची ठेवावी. चांगली शाळा निवडली म्हणजे पालकांनी जबाबदारी संपली असे समजू नये. त्यांनी पाल्यांकडे लक्ष द्यावे.’ शिक्षण जागर पुरस्कारप्राप्त शिक्षकांची जबाबदारी वाढल्याचे रसाळे यांनी सांगितले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते २८ शिक्षकांना ‘शिक्षण जागर’ पुरस्काराने सन्मानित केले. वेतन पथकाच्या अधीक्षक वसुंधरा कदम, बादशहा जमादार उपस्थित होते. शिक्षक सेवक समितीचे राज्य सचिव शिवाजी भोसले यांनी स्वागत केले. विभागीय अध्यक्ष महादेव डावरे यांनी प्रास्ताविक केले. सविता गिरी यांनी सूत्रसंचालन, अनिल सरक यांनी आभार मानले.