राज ठाकरे बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे बोलले
राज ठाकरे बोलले

राज ठाकरे बोलले

sakal_logo
By

त्या पोलिसांचे
निलंबन मागे
मुंबई, ता. १२ ः पिंपरी चिंचवड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्याची राज ठाकरे यांची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याची माहिती सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. राजकीय आंदोलन किंवा निषेध करताना प्रसिद्धीसाठी एखाद्याच्या जीवावर बेतेल असे काहीही करु नका, असे आवाहन राजकीय कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणानंतर पोलिसांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मध्यस्थी करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रसिद्धी पत्रक जाहीर करीत राज ठाकरे यांनी वरील मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कौतुकसुध्दा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे, त्याचा दाखला आज ह्या दोन नेत्यांनी दाखवला, आता इतरांनी पण तो कृतीतून दाखवावा हीच अपेक्षा, त्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली तर निषेध व्हायलाच हवा, आम्ही पण ''मनसे स्टाईल''ने अनेकवेळा निषेध नोंदवतो. पण हे करताना काही संकेत असतात. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधाने करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरु आहेत आणि त्या वादांमधून मते मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे एखादे विधान आले की त्याचे संदर्भ न तपासता कार्यकर्त्यांना भडकवून, स्वतः नामानिराळे राहण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढायला लागलेत. मग ह्यांचे कार्यकर्ते पण कसलाच विचार न करता, कसलीही खातरजमा न करता, वाट्टेल त्या मार्गाने निषेध करत सुटतात, अशी खंत त्यांनी या पत्रकात यावेळी व्यक्त केली.