
यसबा करंडक रविवारी
यसबा करंडक
महोत्सव रविवारी
पंधरा शाळांतील विद्यार्थी कलाकारांचा सहभाग
कोल्हापूर, ता. १२ ः ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक (कै) यशवंत भालकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि यशवंत भालकर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१८) यसबा करंडक आंतरशालेय कला महोत्सव रंगणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांना कलेची आवड वाढावी व कला सादरीकरणासाठी मुक्त व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा महोत्सव होणार असून, शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनात सकाळी नऊला महोत्सवाला प्रारंभ होईल. शहर आणि परिसरातील १५ शाळांचे विद्यार्थी कलाकार महोत्सवात सहभागी होणार असून, चित्रकला, निबंध, एकपात्री अभिनय, समूह गायन, समूह नृत्य अशा पाच कलाप्रकारांमध्ये हा महोत्सव होईल. ‘यसबा करंडक’ हा फिरता असणार आहे. नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर यांची संकल्पना असून, हे महोत्सवाचे पहिले वर्ष आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. प्रकाश गायकवाड आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे संदीप भालकर, सपना जाधव यांनी सांगितले.