मासिक पाळीवर उघडपणे बोलणारा प्रयोग ‘एस आय ब्लीड'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासिक पाळीवर उघडपणे बोलणारा प्रयोग ‘एस आय ब्लीड''
मासिक पाळीवर उघडपणे बोलणारा प्रयोग ‘एस आय ब्लीड''

मासिक पाळीवर उघडपणे बोलणारा प्रयोग ‘एस आय ब्लीड''

sakal_logo
By

68160
कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी गडहिंग्लज कला अकादमीने सादर केलेल्या‘एस आय ब्लीड’ या नाटकातील एक प्रसंग.

मासिक पाळीवर
उघडपणे बोलणारा प्रयोग
‘एस आय ब्लीड’
लैंगिक शिक्षण आणि मासिक पाळीबाबत अजूनही फारशी उघडपणे समाजात चर्चा होत नाही. शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवरही तशीच परिस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर मासिक पाळी आणि लिंगभेदावर उघडपणे बोलणारा, त्याबाबतच्या समज-गैरसमजाबाबत मंथन घडवणारा नेटका प्रयोग सोमवारी गडहिंग्लजच्या गडहिंग्लज कला अकादमीच्या टीमनं सादर केला. स्थानिक लेखक युवराज पाटील लिखित या नाटकाला शिवाजी पाटील यांचे दिग्दर्शन होते.
विज्ञान-तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली तरी काही गोष्टींबाबत अजूनही समाजाने निर्माण केलेल्या प्रथा कायम आहे. मासिक पाळीचा विषयही त्याला अपवाद नाही. मासिक पाळीच्या काळात मुली आणि महिलांवर पूर्वापार चालत आलेली बंधनं अजूनही कैक ठिकाणी जशीच्या तशी आहेत आणि त्यातून त्यांच्या मनाची होणारी घुसमटही तशीच कायम आहे. विशेषतः ग्रामीण भागात अजूनही हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे गडहिंग्लज कला अकादमीच्या टीमनं तीन वर्षांपूर्वी याच विषयावर दहा मिनिटांचे पथनाट्य सादर करण्याचा निर्णय घेतला आणि लेखक युवराज पाटील यांनीच हे पथनाट्य लिहिले. मात्र, त्यानंतर या विषयावर दोन अंकी नाटक व्हायला हवं, असा विचार पुढे आला. मात्र, कोरोनामुळे पुढे फारशी हालचाल झाली नाही. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेसाठी म्हणूनच पाटील यांनी लेखनही पूर्ण केले आणि त्याला तितक्याच ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न या टीमनं केला. मुळात हे नाटक म्हणजे महिला कलाकारांनी आपल्याच साऱ्या माता-भगिनींसह एकूणच समाजाला पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडण्यासाठी केलेला एक प्रयोग असेही म्हणता येईल. मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी. त्यामुळे लहानपणापासूनच तिचे अगदी मुलाप्रमाणेच लाड पुरवले जातात. पण, ज्या दिवशी तिला पहिली पाळी येते, तेंव्हापासून तिच्यावर परंपरेने चालत आलेली काही बंधने लादली जातात. ही लक्ष्मणरेषा कधी पुसली जाणार, अशी चर्चा करण्यापेक्षा मुलींनीच ती आता स्वतःहून ओलांडायला हवी आणि घरातील आई-आज्जींनेही त्यांना पाठबळ द्यायला हवे, असा विचार या नाटकातून मिळतो.
-----------------
पात्र परिचय
- ऊर्मिला कदम (कमल आज्जी), शिवानी डोमणे (विशाखा), सरोज शिंदे (रितू), प्रणोती कुमठेकर (मालती), अर्णवी उपराटे (किरण), विभा शिंदे (अंकिता), समृध्दी पाटील (ऐश्‍वर्या), भक्ती पाटील (रसिका), श्रावणी फल्ले (केतू), साक्षी तिबिले (साठे वहिनी), दत्ता सुतार (कमिटी मेंबर), समर्थ कशाळकर (बातमीदार).
- संगीत : नीलेश शेळके
- नेपथ्य : विनायक कुलकर्णी, तेजश्री पारगावकर
- प्रकाशयोजना : सचिन वारके
- रंगभूषा : सुनील मुसळे
- वेशभूषा : सायली नाईक, दीपाली बदी
- ध्वनी व्यवस्था : रमेश सुतार
--------
आजचे नाटक
- एक्स्पायरी डेट
- अंकुर चॅरिटेबल अँड कल्चरल सोसायटी
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी सात वाजता