रोहित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पवार
रोहित पवार

रोहित पवार

sakal_logo
By

शब्द देऊन बेळगावात न जाणाऱ्या
मंत्र्यांत धमक नव्हती का?ः रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : केंद्रात, महाराष्ट्रात आणि बेळगावमध्ये भाजपची सत्ता आहे. काही मंत्री बेळगावमध्ये जाणार होते. पण, त्यांना येऊ नका म्हणून सांगणे आणि ते महाराष्ट्रातील मंत्र्यांनी ऐकून बेळगावात जात नाहीत, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामुळे बेगळगावमध्ये जातो म्हणून सांगून गेले नाहीत, त्यांच्यामध्ये धमक नव्हती का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी आज केला. बेगळगाव दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार पवार म्हणाले, ‘भाजपने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले आणि गुजरातची निवडणूक मोठ्या संख्याबळावर विजयी झाले. आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद निर्माण करून कर्नाटकची निवडणूक जिंकायची आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले जात आहे. केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. तरीही, महाराष्ट्रातून बेगळगावला जाणार म्हणून सांगणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांनी ऐनवेळी दौरा रद्द केला. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने कमीपणाची गोष्ट आहे. बेळगाव हे महाराष्ट्रातीलच असल्यासारखे वाटते. तेही आपलेच घर आहे. तिथे जायला कोणाची परवानगी घेण्याची गरज नसावी. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणते कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापवण्याचे काम केले जात होते. ज्येष्ठे नेते शरद पवार यांनी इशारा दिल्यानंतर तेथील वातावरण शांत झाले. बेगळगावमधील लोकांनी महाराष्ट्राच्या बाजूने निवेदन जरी दिले तरी त्यांना चाळीस-चाळीस दिवस तुरुंगात डांबले जाते.’

भाजपचा अहंकार
नितेश राणे जे बोलतात तो भाजपचा अहंकार आहे. पूर्वी जी कामे मंजुरी होती, ती सर्व रद्द केली. हा भाजपचा विचार आहे. तसेच ते बोलतात, अशी टीका पवार यांनी केली.

चौकट
...तर विरोध होणारच...
राज्याबाहेरील लोक महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अपमानकारक बोलत असतील तर त्याला विरोध होतच राहणार आहे. त्यामुळेच लोकांनी पुणे बंदचा मार्ग स्वीकारला आहे, आमदार पवार यांनी सांगितले

चौकट
राज ठाकरेंच्या भाषणात भाजप विचार
राज ठाकरे यांच्या ओरिजनल स्टाईलचा मीही फॅन आहे. पण, सध्या ठाकरे यांच्या भाषणात भाजप विचार दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आपली स्टाईल ठेवली तर आम्हीही त्यांच्या विचारासोबत सहमत असू, असेही पवार यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांनी शक्ती कायद्याबद्दल बोलावे
चित्रा वाघ यांनी शक्ती कायद्याबद्दल काय झाले, याबद्दलच मत व्यक्त करावे. दुसरीकडे पोलिस यंत्रणेवर ताण असतानाही एका आमदारामागे पाच असे दोनशे पोलिस काम करत आहेत. याबद्दल याचा गेल्या सहा महिन्यांत किती खर्च झाला, याची तपासणी केली पाहिजे, असे आमदार पवार यांनी सांगितले.