नेसरीच्या सर्वांगीण विकासाला गती देणार : डॉ. अर्चना कोलेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरीच्या सर्वांगीण विकासाला गती देणार : डॉ. अर्चना कोलेकर
नेसरीच्या सर्वांगीण विकासाला गती देणार : डॉ. अर्चना कोलेकर

नेसरीच्या सर्वांगीण विकासाला गती देणार : डॉ. अर्चना कोलेकर

sakal_logo
By

GAD135.JPG :
68239
डॉ. अर्चना कोलेकर
------------------------------------------------
नेसरीच्या सर्वांगीण विकासाला
गती देणार : डॉ. अर्चना कोलेकर
दिनकर पाटील : सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. १३ : नेसरी गावचा विस्तार, तसेच लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात गावची वेगळी ओळख आहे. सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पराक्रमाने गावचे नाव इतिहासात अजरामर आहे. अशा नेसरी गावच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष पुरस्कृत श्री. मसनाईदेवी ग्रामविकास पॅनेलतर्फे निवडणूक रिंगणात असून गावच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, अशी भूमिका डॉ. अर्चना कोलेकर यांनी मांडली.
डॉ. कोलेकर म्हणाल्या, ‘नेसरी विभागातील दीन-दलितांचे कैवारी माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकर, विकासाचे महामेरू स्व. बाबा कुपेकर यांचा वारसा पुढे घेऊन जाताना समाजातील कष्टकरी, कामगार, वंचित, बहुजनांचे कल्याण व न्याय्य हक्कासाठी कार्य करणार आहे. भविष्याचा वेध घेऊन गावच्या शाश्वत विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. सुसज्ज बसस्थानक, बाजारपेठ, क्रीडांगण, पुरातन तलाव व काशिलिंग मंदिर सुशोभीकरण, वैद्यकीय, औद्योगिक शिक्षणाला चालना देणे, तसेच शेतीपूरक उद्योग व्यवसाय निर्मिती करण्याचा मानस आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर, तंटामुक्तचे अध्यक्ष मुन्ना नाईकवाडी आदींच्या मार्गदर्शनाने व सहकार्यातून ग्रामपंचायतीच्या सर्व योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निष्पक्षपाती व प्रामाणिकपणे गट-तट न पाहता गावचा विकास साधण्याचा मानस आहे.’

* माझे व्हिजन
- ४०० मीटर ट्रॅकसहीत क्रीडांगण, ओपन जिम उभारणार
- शहीद सैनिकांच्या स्मारक स्तंभाची निर्मिती
- संविधान भवन बांधकामासह डॉ. आंबेडकर जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणे
- सुसज्ज मैदानाची उभारणी
- युवक व महिलांसाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण राबवणे
- वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ग्रामपंचायतीत स्वतंत्र कक्ष उभारणे
- दसरा चौक सुशोभीकरण, भाजीपाला बाजारकट्टा बांधकाम
- अंत्यविधीसाठी संबंधित कुटुंबांना सानुग्रह अनुदान देणे