
महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या
gad136.jpg
68247
औरनाळ : कित्तूरकर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात बोलताना डॉ. स्वाती कमल. व्यासपीठावर संदीप पाटील, प्रा. अनिता चौगुले, आरती चौगुले आदी.
--------------------------
महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या
डॉ. स्वाती कमल : औरनाळमध्ये श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : वाढत्या ताणतणावामुळे शारिरीक व मानसिक आजार बळावत आहेत. अशा परिस्थितीत महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सकस आहार, योगासने आणि वेळच्यावेळी आरोग्य तपासणी या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. स्वाती कमल यांनी केले.
औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर सुरु आहे. यानिमित्त झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत सदस्या आरती चौगुले अध्यक्षस्थानी होत्या.
सहायक प्रकल्प अधिकारी प्रा. तेजस्विनी खिचडी यांनी प्रास्ताविक केले. सरपंच संदीप पाटील, उपसरपंच शिवाजी सावंत, सुमन चौगुले, अश्विनी अर्नाळकर, सुप्रिया पाटील, वंदना मोरे, अक्षता भोसले, स्मिता चौगुले, तेजस्विनी पाटील, सरला पाटील, वैशाली पोवार, मंगल भोसले, ऋषिता पाटील, ललिता भोसले, प्राचार्य विजय चौगुले, उपप्राचार्या अनिता चौगुले आदी उपस्थित होते. सहायक प्रकल्प अधिकारी प्रा. सुरेश घस्ती यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प अधिकारी प्रा. एन. व्ही. गावडे यांनी आभार मानले.