Mon, Jan 30, 2023

कोश्यारींसह मंत्री पाटील निषेध
कोश्यारींसह मंत्री पाटील निषेध
Published on : 13 December 2022, 12:25 pm
कोश्यारींसह मंत्री पाटील यांचा निषेध
गडहिंग्लज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध महामानवांचा अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांचा निषेध करणारे निवेदन विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले आहे. राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन येथील प्रांत कार्यालयाला सादर केले. भीमशक्तीचे प्रमुख एस. बी. बालेशगोळ, वंचित बहुजन आघाडीचे एस. आर. कांबळे, प्रा. अशपाक मकानदार, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष चिकोडे, कल्पना कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.