शेतकरी संघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी संघ
शेतकरी संघ

शेतकरी संघ

sakal_logo
By

68325

‘मॅग्नेट’ तडजोडीच्या ठरावाला मंजूरी
शेतकरी संघ विशेष सभा; तोट्याची रक्कम संचालकांकडून वसूल करा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : शेतकरी संघ आणि मॅग्नेटमधील चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे संघाला आर्थिक तोटा झाला आहे. तोट्याची ही रक्कम तत्कालीन संचालकांकडून वसूल करावी अशी मागणी शेतकरी संघाच्या सभासदांनी केली. तर, होम केअर रिटेल मार्टकडे (मॅग्नेट) कडे भाडेतत्वार असणारी ३८ हजार १२० स्क्वेअर फूट जागा तडजोड करुन संघाकडे परत मिळवण्याचा ठराव बहुमतानी मंजूर करण्यात आला. शेतकरी सहकारी संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.
संघाचे प्रशासक अमर शिंदे म्हणाले, ‘भवानी मंडप येथील शेतकरी संघाच्या मुख्य कार्यालयातील तळमजला, पहिला मजला, पोटमाळा व दुसरा मजला अशी एकूण ३८१३० स्क्वेअर फुट जागा मॅग्नेज कंपनीला भाडे तत्वावर दिली आहे. यामध्ये प्रतिमहिना कोठा भाडे २ लाख रुपये व संघाचा ट्रेडमार्क वापरासाठी ३ लाख रुपये भाडे ठरले होते. यासाठी १ कोटी ११ लाख रुपये अनामत रकक्म घेतली होती. मात्र, २००९ नंतर संघाला कोणतीही पूर्व सूचना न देता मॅग्नेट कंपनीने बझार बंद केला. करार कालावधीमध्ये मॅग्नेट बझार यांनी वीज, पाणी व महापालिकेचा वार्षिक घरफाळा भरायचा होता. मात्र, ही इमारत संस्थेच्या नावावर असल्याने याचा १० कोटी ५५ लाख ३७ हजार फाळा भरला आहे. मात्र, अनेक वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये संघाचा तोटा होत आहे. यातून तोडगा काढण्यासाठी मॅग्नेटला त्यांनी दिलेली १ कोटी ११ लाख अनामत रक्कम आणि बझारमधील साहित्यांसाठी म्हणून १९ लाख रुपये असे एकूण १ कोटी ३० लाख रुपये दिल्यानंतर संघाची विनावापर असणारी जागा संघाला परत मिळणार आहे. यातून संघाच्या इतर उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान या ठरावाला संघाच्या सभासदांनी हात उंचावून मंजूरी दिली.
आकाराम पाटील, मुकुंद पाटील म्हणाले, ‘शेतकरी संघासोबत करार करताना चुकीचा करार केल्यामुळे संघाला लाखो रुपयांचा तोटा झाला आहे. संचालकांनी केलेल्या चुकीचा करारामुळे संघाला तोटा होत असेल त्याची रक्कम संबंधीत संचालकांकडून वसूल करावी.’
सभासद ॲड. किरण पाटील, भिमराव नाळे, अजितसिंह मोहिते, यशवंत पाटील, संपत इनामदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. ॲड. अशोक साळुखे म्हणाले, मॅग्नेटचा दोन वर्षानंतर करार संपत आहे. त्यामुळे १ कोटी ११ लाख रुपये त्यांना भरण्याची गरज नाही. दोन वर्षानंतर करार संपेल त्यावेळी आपण त्यांचा ताबा घेवू शकतो. यावेळी, प्रशासकीय संचालक प्रदिप मालगावे, कार्यकारी संचालक सचिन सरनोबत, माजी अध्यक्ष युवराज पाटील, जी. डी. पाटील, व्यंकाप्पा भोसले, शशिकांत पाटील-चुयेकर उपस्थित होते.