शाहू समाधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू समाधी
शाहू समाधी

शाहू समाधी

sakal_logo
By

९ कोटी ४० लाखांचा निधी वर्ग
राजर्षी शाहू समाधी स्थळ सुशोभीकर; दुसऱ्या टप्प्यातील कामे लागणार मार्गी

कोल्हापूर, ता. १३ ः नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण, नुतनीकरण तसेच अन्य कामांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत ९ कोटी ४० लाख ५६ हजारांचा निधी आला आहे. लवकरच तो महापालिकेकडे वर्ग केला जाणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळून पाच महिने झाले होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इच्छेनुसार नर्सरी बागेत समाधी साकारण्याचे महापालिकेने ठरवले. त्यानुसार शाहू समाधीस्थळाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामे करण्यासाठी महापालिकेने दोन कोटी ८० लाखांचा निधी वापरला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी नऊ कोटीहून अधिक रकमेची आवश्‍यकता होती. महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ९ कोटी ४० लाख ५६ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. तो निधी वर्ग झालेला नव्हता. समाज कल्याण विभागाकडून हा निधी वर्ग झाल्याची माहिती आज देण्यात आली. महापालिकेच्या समन्वयाने कामे तातडीने करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.
याबाबत निधी येण्याच्या शक्यतेने महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता निधी वर्ग झाल्याने ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन वर्षात दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू केली जाणार आहेत.

चौकट
हे हेणार...
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल नुतनीकरण
-हॉलमध्ये १७५ आसनक्षमतेचे एसी सभागृह
-सभागृहात शाहू महाराजांच्या जीवनावरील
डॉक्युमेंटरी दाखवण्याची व्यवस्था
- सभागृहात व्याख्याने, चर्चासत्र घेण्याची सुविधा
-शिर्के उद्यानाजवळ संरक्षक भिंत, लॅंडस्केपींग
-राजघराण्यातील समाधी मंदिरांचे नुतनीकरण
-पार्किंग सुविधा, स्वच्छतागृहांची व्यवस्था