ई-स्टोअर बॅक खाती गोठवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-स्टोअर बॅक खाती गोठवली
ई-स्टोअर बॅक खाती गोठवली

ई-स्टोअर बॅक खाती गोठवली

sakal_logo
By

‘ई-स्टोअर’ बॅंक खाती गोठवली
कोल्हापूर ः ई-स्टोअर फसवणुकीतील वैदिका आयुर केअर हेल्थ अँड रिटेल प्रा. लि. कंपनीची बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत. अटकेतील तिघा संशयितांच्या बँक खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अटकेतील विनायक कृष्णा राऊत, प्रकाश शंकर चौगले आणि अरविंद सत्यनारायण मिश्रा या तिघांच्याही बँक खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (१६) वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, बेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी ई-स्टोअर इंडिया जनेरस इन्कममध्ये फसवणूक झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात झाली आहे. यामध्ये ई-स्टोअर सुरू करून देण्याचे आमिष दाखवून ३८ लाखांच्या फसवणूक
प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास सुरू असताना वैदिका आयुर केअर कंपनीची बँक खाती गोठविली आहेत.