जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा

जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा

sakal_logo
By

जिल्हास्तरीय लोककला,
लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर, ता. १३ : नटराज डान्स स्टुडिओच्यावतीने जिल्हास्तरीय लोककला व लोकनृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांना रविवारी (ता.१८) पासून प्रारंभ होईल, अशी माहिती संयोजक व मिसेस इंडिया किताब विजेत्या राजेश्वरी मोटे, नृत्यदिग्दर्शक अक्षय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुका आणि शहर स्तरावरील स्पर्धा वैयक्तिक लोकनृत्य आणि सांघिक लोकनृत्य अशा दोन गटांत होतील. प्रत्येक गटातील अनुक्रमे तीन विजेते महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. तत्पूर्वी तालुकास्तरीय स्पर्धा होतील. दोन जानेवारीला गडहिंग्लज, आठ जानेवारीला राधानगरी, १६ जानेवारीला गारगोटी, २२ जानेवारीला इचलकरंजी (हातकणंगले-शिरोळ), २८ जानेवारीला पोर्ले, २९ जानेवारीला गगनबावडा, पाच फेब्रुवारीला कागल, बारा फेब्रुवारीला नेसरी, वीस फेब्रुवारीला बांबवडे, २६ फेब्रुवारीला सांगरुळ येथे लोकनृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. ‌कोल्हापूर शहर स्तरावरील स्पर्धेची प्राथमिक फेरी अठरा डिसेंबरला देवल क्लबमध्ये आहे. प्राथमिक फेरीतील विजेत्यांची अंतिम स्पर्धा होऊन विजेत्यांना दीड लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, नृत्य प्रशिक्षक दीपक बिडकर, शाहीर आझाद नायकवडी, हेमसुवर्णा मिरजकर, संजय पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक फेरीला प्रारंभ होईल. महाअंतिम फेरी मार्चमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रेणुका केकतपुरे, अभिनेते एन.डी. चौगुले यांची उपस्थिती होती.