शेतकऱ्यांनी मशिनरीला बांधली जनावरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी मशिनरीला बांधली जनावरे
शेतकऱ्यांनी मशिनरीला बांधली जनावरे

शेतकऱ्यांनी मशिनरीला बांधली जनावरे

sakal_logo
By

ajr137.jpg
68336
खेडे (ता. आजरा) ः येथे रस्त्याचे काम बंद पाडतांना शेतकरी.
--------------------
शेतकऱ्यांनी मशिनरीला बांधली जनावरे
खेडेत अनोखे आंदोलन; संकेश्‍वर- बांदा महामार्गाचे काम पाडले बंद
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः संकेश्वर - बांदा महामार्गाचे काम आज महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले. खेडे गावाजवळ रस्त्याची बाजू सपाटीकरणाचे काम सुरु असताना शेतकऱ्यांनी मोर्चाने जावून काम बंद पाडले. मशीनरीसमोर ठिय्या ठोकला. मशीनरीला म्हैशी बांधून अनोखे आंदोलन केले.
शेतकऱ्यांची जमीन मोजून योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. खेडेनजीक महामार्गासाठीचे काम सुरु होते. जुन्या रस्त्याच्या बाजूपट्टी सपाटीकरण सुरु होते. ही गोष्ट समजताच शेतकऱ्यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेतली. पोकलॅण्ड व जेसीबीसमोर ठिय्या ठोकत काम बंद पाडले. शिवाजी गुरव म्हणाले, ‘प्रशासनासोबत बैठका होत असताना निर्णय होत नाही. यापूर्वीचा रस्ता हा शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेला आहे. या रस्त्याचे यापुर्वी संपादन झाला नाही. किंवा शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये फेरफार झालेला नाही. रस्त्याचा काही भाग शेतकऱ्यांच्या जमिनीत दिसत आहे. माहितीच्या अधिकाराखाली नकला काढल्यावर आजरा - गडहिंग्लज हा रस्ता साडेपाच मीटरचा दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतून किती रस्ता जातो याची मोजणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार भूसंपादन करावे व शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. ही मागणी आजही कायम आहे. मात्र शासन व प्रशासन शेतकऱ्यांना गाफिल ठेवून रस्ता करत आहे. रस्त्याला आमचा विरोध नाही. पण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देवून रस्ता करावा.’
यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार विकास अहिर यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. पण शेतकऱ्यांनी जमिन मोजणीचा आग्रह धरत नुकसान भरपाईची मागणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे फौजफाट्यासह पोहोचले. त्यांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले व रस्त्याचे काम सुरु झाले. शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, आनंदा नेसरकर, बाळू चव्हाण, गणपती आगलावे, रवि जाधव, श्रीपती पाटील, अशोक डोंगरे, महादेव मुरबाळे, शंकर मुरबाळे यासह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.