गगनबावड्यात ग्राम न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावड्यात ग्राम न्यायालय
गगनबावड्यात ग्राम न्यायालय

गगनबावड्यात ग्राम न्यायालय

sakal_logo
By

गगनबावड्यात
ग्रामन्यायालय
आठवड्यातून एकदा भरणार
लोगो ः राज्य मंत्रिमंडळ निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१३ ः गगनबावडा आणि संख (ता. जत, जि. सांगली) येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्यास व त्यासाठीची आवश्यक पदनिर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. दोन्ही ठिकाणी आठवड्यातून एक दिवस न्यायालय भरणार आहे. दोन्ही ग्राम न्यायालय सुरू झाल्यावर त्या-त्या तालुक्यातील नागरिक, पक्षकार, वकील यांच्यासाठी व्यवस्था व न्यायदान प्रक्रिया लोकाभिमुख होणार आहे.
दोन्ही ग्राम न्यायालयांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायाधिकारी), लघुलेखक श्रेणी तीन, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बेलिफ कम शिपाई अशा प्रत्येकी पाच नियमित पदांच्या निर्मितीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
गगनबावडा येथे दर बुधवारी (शासकीय सुटी वगळून) न्यायालय भरेल. गगनबावडा तालुक्यातील एकूण ४५ खेडी येतात. या खेड्यांमधील एकूण ८३ दिवाणी दावे व ९३ फौजदारी खटले कोल्हापूरच्या न्यायालयात प्रलंबित आहेत. गगनबावडा येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोल्हापूर या न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी ग्राम न्यायालयाचे कामकाज पाहतील. संख परिसरात ३२ खेडी असून, तेथील ग्रामस्थांनाही आता या ग्राम न्यायालयाचा फायदा होईल. संख येथे दर शुक्रवारी (शासकीय सुटी वगळून) न्यायालय भरेल. संख येथील ग्राम न्यायालयाचे कामकाज दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जत या न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी कामकाज पाहतील.