Fri, Feb 3, 2023

कापड दुकानात चोर
कापड दुकानात चोर
Published on : 13 December 2022, 6:06 am
महाव्दार रोडवर कापड दुकानात चोरी
कोल्हापूर ः महाद्वार रोडवरील एका कापड दुकानाचे शर्टर उचकटून चोरट्याने ४५ हजारांचे कपडे पळविले. दुकान मालक मसर्रत नसर्रत खान यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिसांत दिली. पोलिसांनी सांगितले, की काल रात्री खान दुकान बंद करून गेले होते. आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शर्टर उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी दुकानात प्रवेश केला असता वेगवेळ्या कंपन्यांचे टॉप, महिलांचे कपडे, गाऊन असे ४५ हजार रुपयांचे कपडे चोरीस गेल्याचे दिसून आले.