गड-पशुसंवर्धन विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-पशुसंवर्धन विभाग
गड-पशुसंवर्धन विभाग

गड-पशुसंवर्धन विभाग

sakal_logo
By

‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी
अर्ज करण्याचे आवाहन

गडहिंग्लज, ता. १४ : पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचा समावेश आहे. पशुपालकांना ११ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पशुसंवर्धन विभागातर्फे दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करमे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक तीन तलंगा गट वाटप आदी योजनांसाठी अर्ज मागविले आहेत. https.//ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. पशुसंवर्धनच्या विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू केली आहे. एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यांना दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेत यासाठी प्रतीक्षा यादी केली आहे. २०२१-२२ पासून पाच वर्षांसाठी ती लागू आहे. योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. ए. टेकाळे यांनी केले आहे.