कोडग्रस्तांसाठी रविवारी वधू-वर मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडग्रस्तांसाठी रविवारी वधू-वर मेळाव्याचे आयोजन
कोडग्रस्तांसाठी रविवारी वधू-वर मेळाव्याचे आयोजन

कोडग्रस्तांसाठी रविवारी वधू-वर मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

कोडग्रस्तांसाठी रविवारी
वधू-वर मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर, ता. १४ : पांढरे डाग किंवा कोड हा वैद्यकीयद़ृष्ट्या आजार नसतानाही केवळ अंधश्रद्धा व गैरसमजुतीमुळे अंगावर डाग किंवा कोड असणाऱ्या या व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षा येते. या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील श्‍वेता असोसिएशनतर्फे रविवारी (ता.१८) सकाळी दहा ते दोन या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवनात वधू-वर मेळावा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशा वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी होती. त्यानुसार हा मेळावा होणार असून, असोसिएशनकडे नोंदणी असणाऱ्या सर्व इच्छुक वधू-वरांशी व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. सातारा, सांगली, बेळगाव, धारवाड, अकलूज, हुबळी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणचे इच्छुक वधू-वर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.