आरक्षणाबाबत दिशाभूल करत चुकीचा प्रचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणाबाबत दिशाभूल करत चुकीचा प्रचार
आरक्षणाबाबत दिशाभूल करत चुकीचा प्रचार

आरक्षणाबाबत दिशाभूल करत चुकीचा प्रचार

sakal_logo
By

आरक्षणाबाबत दिशाभूल करत चुकीचा प्रचार
मतदारांत संभ्रम; विजयासाठी फंडा, कागल तालुका आघाडीवर
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात आहेत. यातच एखाद्या गावातील एखाद्या प्रभाग एक सर्वसाधारण आणि दोन जागांसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असेल, तर यामध्ये मतदारांची दिशाभूल केली जात आहे. सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज भरलेल्या महिलेले मतदान केले तर ते बाद होवू शकते, त्यामुळे या गटात दोन महिला आणि एका पुरुषालाच मतदान करावे लागते, असे सागून पुरुष उमेदवारांना विजयी करण्याचा फंडा गावागावात वापरला जात आहे. वास्तविक सर्वसाधारण गटात पुरुष किंवा महिला उमेदवार असेल तर कोणालाही मतदान देता येते. पण गावकारभाऱ्यांनी स्वत:च्या सोयीसाठी चुकीचा प्रचाराचा मार्ग अवलंबून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. कागल तालुक्यात हा फंडा चांगलाच गाजत आहे.
जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. यापैकी ४४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होत असतानाच चित्र आहे. यामध्ये विविध आरक्षणानूसार मतदान होणार आहे. मात्र, ज्या प्रभागात सर्वसाधारण महिला आरक्षण आणि सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. अशा गटामध्ये सर्वसारणसाठी केवळ पुरुषाला मतदान दिले तरच तुमचे मत वैध ठरले जाईल नाहीतर ते मतदान अवैध मानले जाईल. असे सांगितले जात आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या आघाडीने प्रचाराचे निवेदन काढून प्रचार सुरू केला आहे. प्रचारासाठी ‘सर्वसाधारण पुरुष’ असे म्हणूनच पत्रके काढली आहेत. सर्वसाधारण गटातून एखादी महिला निवडणूक लढवत असेल, तर तिला मतदान करु नका, तिला मतदान केल्यास मत बाद होणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. हा प्रकार कागल तालुक्यात सर्वाधिक दिसून येत आहे. तसेच सर्वसाधारण गटात उमदेवारी अर्ज भरतानाच अनेकांनी हा गट पुरुषांसाठी राखीव असल्याचे सांगून महिलांना परावृत्त केले आहे.
---------------
चौकट
प्रबोधन करण्याची गरज
सर्वसाधारण गटातील निवडणूक लढवण्यासाठी सर्व जातीतील पुरुष, महिला किंवा तृतीय पंथीय उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तसेच, एखाद्याला पुरुषाऐवजी महिला उमदेवाराला मतदान करायाचे असेल तरीही तो करू शकतो. पण, सर्वसाधारण गटात केवळ पुरुषालाच मतदान करता येते हे सांगणे चुकीचा प्रचार आहे, याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे.