कोवाड-दारुभट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-दारुभट्टी
कोवाड-दारुभट्टी

कोवाड-दारुभट्टी

sakal_logo
By

68492
यर्तनहट्टी ः येथे गावठी हातभट्टीवर कारवाई करताना चंदगड पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व कर्मचारी.

यर्तनहट्टीतील हातभट्टीवर छापा

कोवाड ः यर्तनहट्टी (ता. चंदगड) गावच्या हद्दीत ताम्रपर्णी नदीपात्रालगत अवैध गावठी हातभट्टीवर चंदगड पोलिसांनी छापा मारला. यात ४० ते ५० हजार रुपये किमतीची दारू नष्ट केली. दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे ७ बॅरेलमधील कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट करुन स्टीलची भांडी व बॅरेल जप्त केले. याबाबत चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
अनेक दिवसांपासून नदीपात्रात लपूनछपून गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे काम सुरू होते. दोन दिवसांपूर्वी चंदगड पोलिसांना माहिती मिळाल्याने निरीक्षक संतोष घोळवे यांनी सापळा रचून आज पहाटे ४ ला कर्मचाऱ्यांच्या मदतीने हातभट्टीवर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागल्याने हातभट्टी चालविणारे तत्पूर्वीच पसार झाले होते. कारवाईत हवालदार विनायक सुतार, पोलिस नाईक रामदास किल्लेदार, अमोल पाटील, अमोल देवकुळे, संदीप कांबळे, दत्ता पाटील, ईश्वर नावलगी आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.