मासेवाडीच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ः पांडुरंग तोरगले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेवाडीच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ः पांडुरंग तोरगले
मासेवाडीच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ः पांडुरंग तोरगले

मासेवाडीच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ः पांडुरंग तोरगले

sakal_logo
By

ajr141jpg
03337
पांडुरंग तोरगले
----------------
मासेवाडीच्या विकासाची
ब्लू प्रिंट तयार ः पांडुरंग तोरगले
अशोक तोरस्कर ः सकाळ वृत्तसेवा
उतूर, ता. १४ ः जागतिक पातळीवर शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने २०३० पर्यंत १७ ध्येय व १७९ उद्दीष्टे ठेवली आहेत. भारत सरकारनेही १७ शाश्वत विकासाची ध्येय निश्चित केली आहेत. त्यापैकी ९ संकल्पनावर काम सुरु आहे. या गोष्टींचा विचार करून मासेवाडी ग्रामविकासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. ती ग्रामस्थांसमोर मांडणार असून तज्ज्ञ व जाणकारांची मते घेवून गावच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणार आहे. गत पाच वर्षात ग्रामस्थांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी विकासाच्या रुपाने यशस्वी करता आली. यापुढेही संधी मिळाल्यास गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेवून काम करत राहीन, असे श्री. भुतेश्रर ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार पांडुरंग तोरगले यांनी सांगीतले.
ते म्हणाले, ‘गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला ग्रामस्थांनी मला सरपंचपदाची संधी दिली. त्यांना विश्वासात घेवून अंतर्गत रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणंद रस्ते, ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण व सक्षमीकरण यासह विकासाच्या विविध गोष्टीवर भर दिला. त्यामुळे गावची एक वेगळी ओळख जिल्हा व राज्य पातळीवर तयार झाली आहे. गावाने विविध अभियानात सहभाग घेतला आहे. लोकसहभागामुळे यश मिळाले असून गावाला विविध पुरस्कार मिळाले आहेत. या गोष्टीचा विचार करून ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मला संधी देवून ‘माझी मासेवाडी माझा अभियान’ हे सिध्द केले आहे. यासाठी ग्रामस्थांबरोबर मुंबई ग्रामस्थांचे मोलाचे योगदान मिळत आहे.’
--------------
* माझे व्हिजन
-देशीवाण चिरमुरे वरंगळ हे भाताचे मुख्यपिक असून त्याला जीआय मानांकन मिळवून देणार
- चिरमुरे वरंगळ भातावर प्रक्रिया उद्योग सुरु करून उपपदार्थांची निर्मितीवर भर
- कृषीपर्यटन सुरु करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालणार
- कोरडवाहू शेती बागायत करण्यावर भर देणार
- गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहणार
- विकासाला मानवी विकासाचा चेहरा देण्यासाठी प्रयत्नशील
- माझी मासेवाडी माझा अभियान ही संकल्पना ग्रामस्थांमध्ये रुजवण्यासाठी कार्यरत राहणार