गडहिंग्लजला रविवारपासून लोकशिक्षण व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला रविवारपासून लोकशिक्षण व्याख्यानमाला
गडहिंग्लजला रविवारपासून लोकशिक्षण व्याख्यानमाला

गडहिंग्लजला रविवारपासून लोकशिक्षण व्याख्यानमाला

sakal_logo
By

गडहिंग्लजला रविवारपासून
लोकशिक्षण व्याख्यानमाला
साहित्यप्रेमींसाठी मेजवाणी : पालिकेतर्फे १८ ते २४ डिसेंबरपर्यंत आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील नगरपालिकेच्या पूज्य सानेगुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्यावतीने १८ ते २४ डिसेंबरदरम्यान लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे ४४ वे वर्ष आहे. शहर परिसरातील साहित्यप्रेमींनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे व सहायक ग्रंथपाल राजेंद्र भुईंबर यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘पालिकेच्या वाचनालयाला १४८ वर्षांची तेजस्वी परंपरा आहे. पुरोगामी विचारांची कास धरुन निखळ वैचारिक प्रबोधनाचा हेतू समोर ठेवून पालिकेने १९७८ पासून लोकशिक्षण व्याख्यानमाला सुरु केली. तेव्हापासून अखंडपणे ही व्याख्यानमाला सुरु आहे. आजपर्यंतच्या व्याख्यानमालेत राज्यातील अनेक नामवंत साहित्यिकांनी सहभाग नोंदवला आहे. यावर्षीही राज्याच्या कानाकोपऱ्‍यातून नामवंत वक्त्यांना निमंत्रित केले आहे.’
रविवारी (ता. १८) प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेचे उद्‍घाटन होणार आहे. यादिवशी चित्रपट दिग्दर्शक विवेक देशपांडे (मुंबई) हे चित्रपटसृष्टीतील बदलते तंत्रज्ञान या विषयावर पहिले पुष्प गुंफतील. सोमवारी (ता. १९) गणेश शिंदे (अहमदनगर) यांचे छत्रपती शिवराय व आजचा युवक, मंगळवारी (ता. २०) संजय थोरात (इस्लामपूर) यांचे आपली वाचन संस्कृती, बुधवारी (ता. २१) वैजनाथ महाजन (सांगली) यांचे आपली शिक्षण परंपरा, गुरुवारी (ता. २२) दत्ता पाटील (नाशिक) यांचे लोकपरंपरा व ढासळते मूल्यमापन, शुक्रवारी (ता. २३) अनंत राऊत (अकोला) यांचे कवितेतील जगण व जगण्यातील कविता या विषयावर व्याख्यान होईल. २४ डिसेंबर रोजी सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांचे संवादाचे गल्लीबोळ या विषयावर व्याख्यान होणार आहे.