
नवांगुळ यांना पुरस्कार
gad1411.jpg 68520
सोनाली नवांगुळ, उदय गायकवाड, रावसाहेब आंबूलकर, बाबूराव पोवळ, श्रद्धा पाटील
उदय गायकवाड, सोनाली
नवांगुळ यांना पुरस्कार
गडहिंग्लज पालिकेतर्फे २४ डिसेंबरला वितरण
गडहिंग्लज, ता. १४ : येथील नगरपालिकेच्या पूज्य साने गुरुजी वाचनालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा मुख्याधिकारी तथा प्रशासक स्वरुप खारगे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. २४ डिसेंबरला पुरस्कारांचे वितरण होईल.
कोल्हापूरच्या लेखिका सोनाली नवांगुळ यांना ‘वरदान रागाचे’ या अनुवादित साहित्यासाठी साने गुरुजी साहित्य पुरस्कार, उदय गायकवाड यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, तर बॅ. नाथ पै प्रशालेचे शिक्षक रावसाहेब आंबूलकर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्कार बाबूराव पोवळ, श्रद्धा पाटील यांना जाहीर झाला आहे.
लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण होणार आहे. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी प्रमुख पाहुण्या आहेत. याचवेळी नवांगुळ यांचे व्याख्यान होणार आहे.