ओंकार कॉलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंकार कॉलेज
ओंकार कॉलेज

ओंकार कॉलेज

sakal_logo
By

गडहिंग्लजला साहित्यलेखन कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आणि राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी, ग्रंथालय विभाग व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे एकदिवशीय साहित्यलेखन कार्यशाळा झाली. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. धनंजय घुले प्रमुख पाहुणे होते. काव्य व गझल यांची निर्मिती विचार आणि भावनेतून होत असून कवी हा संवेदनशील असावा लागतो, असे मत डॉ. सुनंदा शेळके यांनी व्यक्त केले. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यावर आधारीत भित्तीपत्रिकेचे प्रकाशन बाळासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. रेखा पोतदार, समीर कुलकर्णी, कविता पोळ, सचिन पाटील उपस्थित होते. डॉ. शर्मिला घाटगे यांनी स्वागत केले. प्रा. भीमराव शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. क्रांती शिवणे यांनी आभार मानले.
-
निर्भया पथकाकडून समुपदेशन
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाद्वारे पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले. पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शीतल सिसाळ यांनी मार्गदर्शन केले. पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली. स्वसंरक्षणाविषयी मुलींना सूचना दिल्या. आठवी गणित प्रावीण्य परीक्षेत प्रज्ञापात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सिसाळ यांच्या हस्ते सत्कार झाला. सहायक फौजदार तानाजी पाटील, पोलिस नाईक सतीश कांबळे, कॉन्स्टेबल रेश्मा क्षीरसागर, मानतेश पाटील, सौ. घोरपडे, प्रा. महाजन उपस्थित होते एस. एस. देसाई यांनी स्वागत केले. प्राचार्य पी. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्ही. आर. पालेकर यांनी आभार मानले.