राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला रविवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला रविवारपासून
राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला रविवारपासून

राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला रविवारपासून

sakal_logo
By

राजर्षी शाहू व्याख्यानमाला रविवारपासून
कोल्हापूर, ता. १४ : महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत श्री भास्करराव जाधव वाचनालयातर्फे रविवारपासून (ता. १८) राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. २२ डिसेंबरपर्यंत सायंकाळी सहा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पाच व्याख्याने होणार आहेत.
रविवारी (ता. १८) ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के (पुणे) यांचे चला जगूया आनंदाने या विषयावर, सोमवारी (ता. १९) ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक
डॉ. अमर अडके यांचे दुर्गवाटांवरची चार दशके हे व्याख्यान होणार आहे. मंगळवारी (ता. २०) लेखक प्राचार्य अनिल बोधे (रहिमतपूर) यांचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस या विषयावर, बुधवारी (ता. २१) परिविक्षाधीन तहसीलदार संदीप पाटील (उस्मानाबाद) यांचे दहावी, बारावीनंतरच यूपीएससी, एमपीएससीची तयारी, तर गुरुवारी (ता. २२) राजाराम महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. ऋषीकेश दळवी यांचे यूपीएससी, एमपीएससी परीक्षेचे बदलते स्वरूप, आव्हान आणि दृष्‍टिकोन या विषयावर व्याख्यान होणार आहे.