Tue, Jan 31, 2023

बेवारस मृतदेह
बेवारस मृतदेह
Published on : 14 December 2022, 3:38 am
रेणुका मंदिराजवळ आढळला मृतदेह
कोल्हापूर ः मंगळवार पेठेतील रेणुका मंदिराजवळील ओढ्यात आज दुपारी बेवारस मृतदेह आढळला आहे. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ असून, अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, केस काळे, अंगात फूल निळा शर्ट व काळी पॅन्ट असा वेश परिधान केला आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.