नोकर भरतीची लगबग वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकर भरतीची लगबग वाढली
नोकर भरतीची लगबग वाढली

नोकर भरतीची लगबग वाढली

sakal_logo
By

नोकर भरतीची वाढली लगबग
कोल्‍हापूर, ता. १४: राज्य शासनाने नोकर भरतीची घोषणा केल्याने सर्व शासकीय अस्‍थापना कामाला लागल्या आहेत. जिल्‍हा परिषदेतही मोठी भरती होणार आहे. याबाबतचा आढावा सातत्याने सुरू आहे. विभागनिहाय रिक्‍त जागा, आरक्षण, पदोन्‍नती याबाबतची माहिती संकलित केली जात आहे. भरतीपूर्व सर्व विभागांनी आवश्यक माहिती बिनचूक द्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्या.
मागील आठ, दहा वर्षे नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे रिक्‍त जागांचे प्रमाण वाढले आहे. नोकर भरती नसल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. यातून दप्‍तरदिंरगाईचे प्रमाणही वाढले आहे. यातच मध्यंतरी दोन वेळा भरती करण्याचा प्रयत्‍न झाला. मात्र याकामी नेमल्या गेलेल्या संस्‍थांबाबत तक्रारी झाल्या. यातील गैरप्रकारही पुढे आले. त्यामुळे भरती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलली. राज्यात आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने मात्र नोकर भरतीचे आश्‍‍वासन दिले आहे. त्यानुसार शासकीय संस्‍थांनी तयारी सुरू केली आहे.
जिल्‍हा परिषदेचा विचार करता किमान एक हजार रिक्‍त जागांवर भरती होईल, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये सर्वच विभागांकडील तांत्रिक व अतांत्रिक पदांचा समावेश आहे. पदनिश्‍चिती करण्यापूर्वी रोश्‍‍टर तपासणी अत्यावश्यक आहे. अपवाद वगळता सर्व विभागांची रोश्‍‍टर तपासणी झाली आहे. तसेच खात्यांगर्त होणारी पदोन्‍नती विचारात घेवून खुल्या भरती प्रक्रियेत समाविष्‍ट होणाऱ्या पदांची माहितीही तयार झाली आहे.