इचल :कोऱ्या शिधापत्रिका गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल :कोऱ्या शिधापत्रिका गायब
इचल :कोऱ्या शिधापत्रिका गायब

इचल :कोऱ्या शिधापत्रिका गायब

sakal_logo
By

पुरवठा कार्यालयातून कोऱ्या शिधापत्रिका गायब
इचलकरंजीतील प्रकार; चलनात लाखभराचा घोळ, महा-ई-सेवा केंद्रांना फटका

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी,ता. १५ : इचलकरंजी पुरवठा कार्यालयामधील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या कोऱ्या शिधापत्रिकांचा ताळमेळ लागत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या समोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. शिधापत्रिकांच्या रकमेची तूट भरून काढण्यासाठी महा ई सेवा केंद्र चालकांकडून महिन्याकाठी ५०० ते १ हजार ५०० रुपये वर्गणी काढण्यात येत असल्याचे समजते. त्याचा फटका केंद्रचालकांना बसत आहे.
शहरात नुकताच शेकडो शिधापत्रिका कचऱ्यात आढळल्या. हे प्रकरण ताजे असतानाच कोऱ्या शिधापत्रिकेचा ताळमेळ लागत नसल्याची माहिती मिळाली. पुरवठा कार्यालयात एजंटांचा वावर व त्यांच्याकडून होणारी शासकीय दप्तर हाताळणी नागरिकांच्या नजरेस येत असते. तक्रारीही होऊनही ठोस कारवाई केली नसल्याने कर्मचारीच अडचणीत सापडल्याचे दिसत आहेत.
शहरात पांढरी, केसरी, पिवळी (अंत्योदय) अशा एकूण ९० हजार ५२७ शिधापत्रिका आहेत. पाच वर्षाच्या कालावधीनंतर शिधापत्रिका दुबार करणे आवश्यक असते. त्यासाठी शासन कोऱ्या शिधापत्रिका पुरवठा कार्यालयाकडे पाठवीत असते. या कोऱ्या शिधापत्रिका गोडावूनमध्ये ठेवून मागणीनुसार वाटप होते. मात्र इचलकरंजीत गोडावूनमध्ये शिधापत्रिकांबाबत अनेक वर्षापासून तपासणी न केल्याने नोंदीत संख्येच्या तुलनेत १ हजार ते पंधराशे कोऱ्या पत्रिका कमी दिसल्या. त्यांची रजिस्टरमध्ये नोंद नसल्याने कर्मचाऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला.
---------
चौकट
महा-ई-सेवा केंद्रचालकांना चलन भरण्याचे निर्देश
पुरवठा कार्यालयामधून पांढरे शिधापत्रिका पुस्तक १०० रुपये, केसरी ४० रुपये (दुबार) नवीन २० रुपये, पिवळे दुबार २० रुपये, अशी आकारणी होत आहे. शिधापत्रिकेची रक्कम पूर्वी कार्यालयाच्या माध्यमातून कर्मचारी ग्रास प्रणालीद्वारे महिन्यास भरत होते. मात्र शिधापत्रिका गायब झाल्याचे निदर्शनास आल्यापासून शिधापत्रिका चलन महा-ई-सेवा केंद्रचालकांना भरण्याचे निर्देश दिले आहेत.
-------
प्रतिक्रिया
कोऱ्या शिधापत्रिका गायब होणे गंभीर बाब आहे. ज्या शिधापत्रिकांचा ताळमेळ लागत नाही त्याचा वापर झाला आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी.
- सदा मलाबादे, कामगार नेते
------------
कोट
पुरवठा कार्यालयामध्ये कोऱ्या शिधापत्रिकांबाबत पडताळणी होत असते. त्यामध्ये आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे असा प्रकार घडलेला नाही.
- अमित डोंगरे, पुरवठा अधिकारी
-----------
चौकट
पिवळी* केशरी* शुभ्र* एकूण
बीपीएल /अंत्योदय* phh केशरी /nph केशरी*
११४९० / ४८५६* २९१८९ / ४०७१०* ४२८२* ९०५२७