विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची
विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेअंतर्गत घेतलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये विनायक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. १४ वर्षांखालील थाळीफेक स्पर्धेत क्षवण जानकर प्रथम, १७ वर्षांखालील भालाफेकमध्ये - मनस्वी खर्जे प्रथम, ४०० व ८०० मी धावणे- अंजली पाटील द्वितीय, हातोडाफेक प्रथम व थालीफेक द्वितीय -निकिता माने, हातोडाफेक- पूर्वा कोकणे प्रथम, प्रतीक्षा शहापूरकर तृतीय, हातोडाफेक - तन्मय राऊत-द्वितीय. १९ वर्षांखालील हातोडाफेक - समीक्षा कुंभार प्रथम, वैष्णवी वासगडे द्वितीय या विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
---------------
‘मराठी मीडियम’चे यश
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे घेतलेल्या श्रीनिवास रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षेत मराठी मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये प्रशालेच्या पाचवीमधील नऊ विद्यार्थ्यांनी, तर आठवीमधील १५ विद्यार्थी, असे एकूण २४ विद्यार्थी यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांची पुढील गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे.
-----------------------------
वेटलिफ्टिंगमध्ये हर्षदा पाटीलला सुवर्णपदक
इचलकरंजी : येथील रत्नदीप हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी हर्षदा पाटील हिने राज्यस्तरिय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. तिच्या यशामध्ये तिचे वडील अमर पाटील, विजय माळी, विश्वनाथ माळी, प्रशालेचे मुख्याध्यापक डी. एस. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
------------------------
सिद्धांत पाटील राज्यात प्रथम
इचलकरंजी : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, शालेय प्रसार परीक्षा विभागामार्फत घेतलेल्या इंग्रजी प्री- इलेमेंटरी, ज्युनिअर, सीनिअर व अॅडव्हान्स या परीक्षेत मराठी मीडियम हायस्कूल शाळेच्या सिद्धांत पाटील याने यश मिळवले. महाराष्ट्रामध्ये एकाचवेळी घेण्यात येणाऱ्‍या परीक्षेत आठवीमधील सिद्धांत याने ज्युनिअर परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आला. त्याच्या या यशाबद्दल सत्कार केला. परीक्षांसाठी सहावी व दहावीमधील १२७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
------------------------
‘इकरा’स्कूलमध्ये बैठक
इचलकरंजी : इकरा उर्दू सेमी इंग्लिश स्कूल शहापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक पालक कमिटी यांची बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा, शैक्षणिक गुणवत्ता कशी सुधारावी, याबद्दल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अकीक कोनकेरी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस शाळेचे चेअरमन लतिफ गैबान, सानिया गैबान, पालक प्रतिनिधी समीर अत्तार, शरीफ तेलसंग, युनूस मुल्ला आदी उपस्थित होते.
---------------
साई इंग्लिश स्कूलचे यश
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे घेतलेल्या जिल्हास्तरीय विविध शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेत साई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. स्पर्धेमध्ये बुद्धिबळ, धावणे, गोळा फेक, ५ किमी चालणे, लांब उडी, तायक्वांदो आदी प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रिले १४ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय, टेबल टेनीस १४ वर्षांखालील मुले तृतीय, मुली द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुली खो-खो गटात द्वितीय क्रमांक मिळवला.
-------------------
गोविंदराव हायस्कूलचे यश
इचलकरंजी : तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रज्ञाशोध परीक्षेत गोविंदराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यामध्ये सहावी विज्ञान जिल्हास्तरीय परीक्षेसाठी १३ विद्यार्थी, तर नववीचे ८ विद्यार्थी पात्र झाले. गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठी एक विद्यार्थिनी पात्र झाली. विद्यार्थ्यांना एस. एम. गुरव, एस. एस. गावडे, पी. ए. कोल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------
माई बाल विद्या मंदिरमध्ये क्रीडामहोत्सव
इचलकरंजी : माई बाल विद्या मंदिरमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन राष्ट्रीय योगासन विजेत्या श्रीनंदन मालपाणी यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करून केले. युग म्हेत्रे याने योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवले. वैशाली नेजे यांना जिल्हास्तरीय शिक्षण जागर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेतर्फे सन्मानित केले. प्रा. निर्मला ऐतवडे, माधुरी मर्दा, डॉ. मीना तोसनीवाल, निकिता शहा, स्मिता चौगुले, डॉ. मर्दा, डॉ. तोसनीवाल, मनीषा पाटील उपस्थित होते.