
शरद इंजिनिअरींगमध्ये प्रोजेक्ट स्पर्धा
jsp1620
68885
यड्राव ः येथे शरद इंजिनिअरिंगमध्ये आविष्कार प्रोजेक्ट स्पर्धेतील विजेत्यांसोबत अनिल बागणे, विद्यापीठ प्रतिनिधी आदी.
शरद इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट स्पर्धा
दानोळी, ता. १६ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत ‘अविष्कार २०२२’ ही प्रोजेक्ट स्पर्धा झाली. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ महाविद्यालयातून १०० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले.
पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर अशा तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर सहा क्षेत्रांमध्ये विद्यार्थी त्यांच्या संशोधनाची मांडणी पोस्टर किंवा मॉडेलच्या स्वरूपात केले होते. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये पदवी स्तरावर प्रथम शरद इन्स्टिट्यूटच्या मुक्ता जोशी, तर द्वितीय गौरी केंजाळे ठरले. पदव्युत्तरमध्ये अक्षयकुमार कदम व नितीन देशमाने विजेते ठरले. अॅग्रीकल्चर, अॅनिमल हजबड्रीमध्ये (पदवी) रोहित पाटील व शरद कृषीचा अनिकेत म्हेतर, (पदव्युत्तर) शिवानी काकडे, शेजल मेठा विजेते ठरले. मेडिसीन, फार्मसीमध्ये (पदवी) साक्षी पाटील, अमित कदम, (पदव्युत्तर) राजेश्वरी देशमुख, प्राचा ऐवळे, प्युअर सायन्समध्ये (पदवी) स्वप्नाली चव्हाण, अभिषेक शर्मा, (पदव्युत्तर) ऋतुजा निकम, उत्कर्ष यादव, कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉमध्ये (पदवी) सुयश शिंदे, चैतन्य साळुंखे, ह्युमॅनिटी, लँग्वेज आणि फाइन आर्टमध्ये (पदवी) वैभव जाधव, सिद्धेश गायकवाड, (पदव्युत्तर) तेजस महागावकर हे विजेते ठरले.
परीक्षक म्हणून अमित चौगुले, एस. वाय. तंगडी, अॅड. दिलशाद मुजावर, अॅड. रेश्मा बुरुड, डॉ. बाहुबली माणगांवे, प्रा. संजय फलके, डॉ. सुहास सपाटे, डॉ. सुमय्या इनामदार, डॉ. सुनंदा यादव, डॉ. धनराज जडगे, डॉ. सचिन पाटील होते.