आजरा ः टस्कराने मारला घनसाळ भातावर ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टस्कराने मारला घनसाळ भातावर ताव
आजरा ः टस्कराने मारला घनसाळ भातावर ताव

आजरा ः टस्कराने मारला घनसाळ भातावर ताव

sakal_logo
By

68955

जेऊर (ता. आजरा) ः येथे खळ्यावर विस्कटलेले भात भरताना शेतकरी
---------


टस्कराचा आजरा घनसाळवर ताव

जेऊरमध्ये खळ्यात धुडगूस ः पोती विस्कटली, शेतकरी चिंताग्रस्त
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः जेऊर- कासारकांडगाव येथील ‘देवाची बारी’ या जंगलात टस्कराने मुक्काम ठोकला असून तो पिकांचे नुकसान करीत आहे. त्याने ‘पटकी’ नावाच्या शेतातील एका खळ्यावर धुडगूस घालत भाताची पोती विस्कटली व घनसाळ भातावर ताव मारला. खळ्यातील सात क्विंटल भात विस्कटून टाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. टस्कराला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकरी वनविभागाकडे करीत आहेत.
मागील दहा दिवसांपासून टस्कर ‘देवाची बारी’ या जंगलात मुक्कामाला आहे. सायंकाळ होताच तो जंगलातून थेट पिकात उतरुन नुकसान करतो. त्याने ऊस, बांबू, केळी, भाताचे नुकसान केले आहे. रात्री तो जेऊरमधील ‘पटकी’ नावाच्या अर्जुन तर्डेकर यांच्या शेतात उतरला. त्याने खळ्यावर मळून ठेवलेली आजरा घनसाळ भाताची सात पोती सोंडेने उचलून फेकून दिली. या पोत्यात असलेले भात विस्कटून त्यावर मनसोक्त ताव मारला. घनसाळ भाताला वास असल्याने तो खळ्यावर आला असल्याचे तर्डेकर यांनी सांगितले. पुढे तो चितळे परिसरात गेला. तेथे त्याने देसाई वस्तीजवळील नारायण देसाई यांच्या उसाचे नुकसान केले.
...

पाणीसाठ्यामुळे परिसरात मुक्काम ...
जेऊर व चितळेपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर उचंगी प्रकल्प आहे. त्यामुळे तो या प्रकल्पात सायंकाळच्या वेळी उतरतो व मनसोक्त डुंबतो. अंधार पडल्यावर शेतामध्ये जाऊन पिकावर ताव मारतो. पाणीसाठ्यामुळे त्याचा या परिसरात मुक्काम वाढल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.