जळकं तेल ताराबाई पार्कात अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळकं तेल ताराबाई पार्कात अधिक
जळकं तेल ताराबाई पार्कात अधिक

जळकं तेल ताराबाई पार्कात अधिक

sakal_logo
By

ताराबाई पार्कात
जळकं तेल अधिक

अन्न विभागाचा निष्कर्ष

कोल्‍हापूर, ता. १६ ः एक-दोन वेळा एखादा पदार्थ तळला तर त्यानंतर पुन्हा त्या तेलाचा वापर करता येत नाही. हे तेल खराब होते. त्यामुळे अशा तेलाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न विभागाने घेतले तेव्हा शहरातील इतर ठिकाणांपेक्षा ताराबाई पार्क येथील दोन ठिकाणी अपायकारक (जळंक तेल) आढले आहे. त्याचीही तपासणी सुरू आहे.
फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅन्डर्डस ऑथेरेटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार खाद्य तेलातील ‘टीपीसी’ या पद्धतीनुसार हे मापदंड मोजले जातात.
‘एफएसएसआयए’च्या अधिसूचनेनुसार ताजे वनस्पती चरबी किंवा तेलातील एकूण ध्रुवीय संयुगे १५ टक्के पेक्षा जास्त नसावेत. तसेच भाजीपाला, चरबी किंवा तेल वापरलेल्यांसाठी एकूण २५ टक्के पेक्षा जास्त ध्रुवीय संयुगे वापरली जावू नयेत. मात्र, शहरात ठिकठिकाणी वडा, कांदाभजीसह ज्या ठिकाणी पदार्थ तळले जातात, असे हॉटेल, वडा सेंटर, स्कॅन सेंटर, चायनिज सेंटर येथील काही नमुने घेण्यात आले. त्यावेळी शहराच्या इतर भागांपेक्षा ताराबाई पार्क परिसरतील दोन ठिकाणी तब्बल ३६ आणि ३२ टक्क्यांपेक्षा अधिक ध्रुवीय संयुगे असलेले तेल वापरल्याचे दिसले. २५ टकियापेक्षा अधिक संयुगे असू नयेत असा नियम आहे. मात्र, तेथे ३२- ३६ आढळले आहे. त्यामुळे हे तेल आरोग्यास अपायकारक आहे. दोषी नमुन्यात ताराबाई पार्क परिसरातील एक स्नॅक सेंटरचाही समावेश आहे. हे ठिकाण उच्चभ्रुंचे मानले जाते, अशी माहिती सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.