फिरते ग्रंथालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिरते ग्रंथालय
फिरते ग्रंथालय

फिरते ग्रंथालय

sakal_logo
By

03937
कोल्हापूर ः दसरा चौक येथे फिरत्या ग्रंथालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील. शेजारी राहुल चिक्‍कोडे, महेश जाधव, विजयसिंह खाडे आदी.
.......


‘ध’ चा ‘मा’ करू नका

चंद्रकांत पाटील : वाचन संस्कृती टिकविण्यासाठी फिरते ग्रंथालय सुरू
कोल्हापूर, ता. १६ ः वाचल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, त्यासाठी अधिकाधिक पुस्तके नीट वाचावीत. चिंतन, मनन यातून समजले नाही तर दोन वेळा वाचा. पण '' ध '' चा ''मा '' करू नका. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी शहर व शाळा परिसरात फिरते ग्रंथालय सुरू करुन वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगीतले. दसरा चौकात आज झालेल्या फिरत्या ग्रंथालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘फिरत्या ग्रंथालयाचा पुण्यात पहिल्यांदा प्रयोग सुरू केला व तो यशस्वी झाला. त्यामुळे हा उपक्रम कोल्हापूर शहर व शाळा परिसरात राबवून या उपक्रमाची व्याप्ती वाढविणार आहे. त्यामध्ये सुमारे ५ हजार पुस्तके असल्याने शहरातील विविध ठिकाणी थांबून त्यांची वाचकांसाठी मोफत सेवा देण्यात येणार आहे. तसेच शालेय मुलांसाठी ही योजना एक जानेवारीपासून सुरू होईल. लवकरच फिरते रूग्णालय हा उपक्रमही सुरू होणार आहे.’’

‘भारतीय जनता पक्ष लोकांची कामे करतो. त्यांच्यासाठी राबतो. त्यामुळेच लोक निवडून देतात. महाराष्ट्रात सध्या जे काही चालले आहे, त्याला चोख उत्तर देण्यासाठी आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाला भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिक्‍कोडे, सुहास लटोरे, महेश जाधव, सत्यजित कदम, अमोल पालोजी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, संदीप देसाई, शंतनू मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...

महापुरुषांचा जयघोष व स्वागत

मंत्री पाटील यांच्यावर शाई फेकीची घटना नुकतीच घडली. त्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांतर्फे सकाळी रेल्वेस्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी मंत्री पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा जयघोष केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या. त्यानंतर मंत्री पाटील दसरा चौकातील कार्यक्रमासाठी आले. तेथे बोलताना त्यांनी ‘ध’ चा ‘मा’ करू नका, असा उपरोधिक टोला लगावला.