
आत्मक्लेश वॉक
महापुरुषांच्या सन्मानासाठी
कोल्हापुरातून आत्मक्लेश वॉक
कोल्हापूर, ता. १६ ः महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या कृतीचा, अविचारांचा कडेलोट करण्यासाठी ७ जानेवारीला कोल्हापूर ते पन्हाळ्यापर्यंत आत्मक्लेश वॉक काढण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सहभागी होण्याचे आवाहन फिरोज शेख यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वॉक सुरूवात होऊन सोन्या मारुती चौक, पंचगंगा पूलमार्गे पन्हाळ्यावर तीन दरवाजा तटबंदीवर विसर्जित होईल. छत्रपती, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या कृतीचा, अविचारांचा कडेलोट असा संदेश असलेला ७० फूट लांबीच्या फुटांचा बॅनर तटबंदीवर धरत अशा अविचारी वक्तव्यांचा प्रतिकात्मक कडेलोट करण्याचे नियोजन आहे. तसेच यापुढे अशी विधाने केल्यानंतर माफी मागणाऱ्यांना माफी न देता गुन्हे दाखल करण्यात यावेत, कोर्टाने शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. बॅनरवरील संदेश विविध माध्यमातून सर्वत्र पोहचवला जाणार आहे.