अधिवेशनानंतर सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायमूर्तीची भेट घेवू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिवेशनानंतर सर्किट बेंचसाठी 
मुख्य न्यायमूर्तीची भेट घेवू
अधिवेशनानंतर सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायमूर्तीची भेट घेवू

अधिवेशनानंतर सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायमूर्तीची भेट घेवू

sakal_logo
By

अधिवेशनानंतर सर्किट बेंचसाठी
मुख्य न्यायमूर्तीची भेट घेऊ
मुख्यमंत्र्यांचे खंडपीठ कृती समितीला आश्वासन


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर-रत्नागिरी, ता. १६ ः कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ. त्यानंतर चर्चेतून प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्‍वासन दिले.
निवृत्त मुख्य न्यामूर्ती दीपांकर दत्ता यांनी जुलै २०२२ मध्ये खंडपीठ कृती समितीस पत्र पाठवून मुख्यमंत्री व माझी या विषयी भेट झाल्यानंतर सर्किट बेंच निर्णय घेतला जाईल, असे कळविले होते. या विषयी आज उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने रत्नागिरी येथे खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व बार कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी सहा जिल्ह्याचा लढा अंतिम टप्‍प्यात आहे. मुख्य न्यायमूर्ती यांच्या पत्रानुसार तुम्ही सर्किट बेंच प्रश्नी त्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे यांनी ३७ वर्षांचा लढ्याची आपल्या कारकिर्दीमध्ये यशस्वी सांगता व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्किट बेंच लढा आमचा जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे अधिवेशन संपताच या प्रश्नी मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी पत्र व्यवहार करून भेट घेऊ व हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले.
या वेळी माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस व पंढरपूरचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. भगवान मुळे यांनी मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट दिली व तुळशीहार घालून सत्कार केला. खंडपीठ कृती समिती शिष्टमंडळात विजयकुमार ताटे देशमुख, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, ॲड. नारायण भांदिगरे, सांगली बारचे अध्यक्ष प्रदीप जाधव, भाऊसाहेब पोवार, रत्नागिरी बारचे अध्यक्ष दिलीप धारिया, मधुकर नाईकनवरे, राहुल बोडके, प्रताप हारुगडे, (सांगली), सचिन पाटील, फारूक मुजावर, सुभाष संकपाळ आदींचा समवेश होता.