Sat, Feb 4, 2023

मुंबई महाविकास मोर्चा
मुंबई महाविकास मोर्चा
Published on : 16 December 2022, 4:11 am
‘हल्लाबोल’ मोर्चास कोल्हापुरातून
अडीच हजारांवर कार्यकर्ते रवाना
कोल्हापूर ः मुंबईत उद्या (ता. १७) ‘महाविकास आघाडी’तर्फे काढण्यात येणाऱ्या ‘हल्लाबोल’ मोर्चात जिल्ह्यातून अडीच हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी पक्षाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांना मोर्चाला जाण्याविषयी सूचना दिल्या असून बहुतांश कार्यकर्ते सकाळपर्यंत मुंबईत पोचतील, असे सांगण्यात आले. पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत पोचलो असून शहर आणि जिल्ह्यातील आणखी काही कार्यकर्ते सकाळपर्यंत मुंबईत पोचतील, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.