Sun, Jan 29, 2023

पुस्तक
पुस्तक
Published on : 16 December 2022, 5:50 am
‘राजर्षी शाहू’ ग्रंथाचे आज प्रकाशन
कोल्हापूर : रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान (वाई), सार्थक सांस्कृतिक केंद्र, क्रिएटिव्ह टीचर्स फोरम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी संपादित केलेल्या ‘लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती: राजर्षी शाहू’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी (ता. १७) होणार आहे. सार्थक सांस्कृतिक केंद्र (हॉटेल पॅव्हेलियन समोरची गल्ली, स्टेट बँक व एस्.एस्. कम्युनिकेशन जवळ) येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ग्रंथ प्रकाशित होत असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सागर बगाडे व संजय कळके यांनी केले आहे.