दानोळीच्या राजश्री शिराळे हिची तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दानोळीच्या राजश्री शिराळे हिची तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
दानोळीच्या राजश्री शिराळे हिची तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

दानोळीच्या राजश्री शिराळे हिची तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

jsp1720/ 69015- राजश्री शिराळे

तायक्वाँदो स्पर्धेसाठी राजश्रीची निवड
दानोळी, ता. १७ ः येथील कु. राजश्री शिराळेने तालुकास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. ती जयसिंगपूर येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयकडून खेळत आहे. अब्दुललाट येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेमध्ये झाल्या.
राजश्रीने ४९ ते ५१ या वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. राजश्रीला जिमखाना विभागप्रमुख प्रा. कुबेर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष शांतिनाथ कांते, मानद सचिव सुहास पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक, जुनिअर विभागप्रमुख सलीम मुजावर, आई रेखा शिराळे, वडील राजेंद्र शिराळे यांचे प्रोत्साहन लाभले.