Wed, May 31, 2023

शरद कृषिच्या विद्यार्थ्याची फुटबॉल संघात निवड
शरद कृषिच्या विद्यार्थ्याची फुटबॉल संघात निवड
Published on : 17 December 2022, 2:06 am
jsp1722/ 69020- संयम पाटील
शरद कृषीच्या विद्यार्थ्याची निवड
दानोळी, ता. १७ ः जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषी महाविद्यालयमधील संयम सुहास पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. जबलपूर (मध्य प्रदेश) येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयमध्ये पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेची निवड चाचणी महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली. त्यामध्ये संयम यांची निवड झाली.
संस्थाध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.